नवी दिल्ली – भारतीय संघाचे चाहते पूर्ण विश्वात आहेत. भारतीय संघाचा सामना कोठेही असू चाहते तो पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. कारण भारतीय संघाची कामगिरी तिन्ही प्रकारात उत्तम आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू खूप प्रसिद्ध आहेत.
परंतु आज आपण या लेखाच्या माध्यमातून अशा भारतीय खेळाडूंबद्द्ल सांगणार आहोत, ज्यांचे हमशकल्स आढळून आले आहेत आणि ते सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे अशा पाच खेळाडूंच्या हमशकल्स बाबत जाणून घेऊया जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यांच्यावर खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाच भारतीय दिग्गज खेळाडू आणि त्यांचे हमशकल्स:
1.युवराज सिंह
आयसीसीच्या चॅम्पियन ट्रॉफी 2017 मध्ये भारतीय संघ रनर – अप राहिला होता. युवराज सिंगची ही शेवटची आयसीसी स्पर्धा होती. सेमी फायनलच्या सामन्यात बांग्लादेश विरुद्ध खेळलेला सामना युवराजचा 300 वा वनडे सामना होता.
या सामन्या दरम्यान एक असा चाहता आढळून आला होता, जो हा सामना पाहण्यासाठी आला होता. उल्लेखनीय म्हणजे तो हुबेहूब युवराज सिंग सारखा दिसत होता. त्यामुळे तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. त्यानंतर युवराज सिंगने या चाहत्यांसोबत एक फोटो काढला होता. तो फोटो बीसीसीआय ने ट्विटरवर शेअर केला होता.
2. जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा सुद्धा एक हमशकल आहे. जो भारतात नसून पाकिस्तान मध्ये आहे. जसप्रीत बुमराहने 2016 साली भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्याच्या हमशकलचा फोटो पुढे आला होता. इंडिपेंडेंस कपच्या दरम्यान एका चाहत्यांने त्या हमशकल सोबत फोटो काढून शेअर केला होता.
#NDTVBeeps | For years, Balvir Chand, better known as the 'other Sachin Tendulkar', has made public appearances as the cricket legend's doppelgänger. Chand recently tested positive for #COVID19. Here's what he said after spending time in an isolation ward. pic.twitter.com/auhzWFKEHw
— NDTV (@ndtv) June 25, 2020
3.सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणून ज्या खेळाडूंची विश्वात ओळख आहे, अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील एक हमशकल आहे. त्याचे नाव बलबीर चंद असे आहे. तो सचिनचा हमशकल असल्याने तो सचिनच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बरेच चाहते त्या हमशकल सोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात इतकेच नाही तर या हमशकलला मुंबईतील एका फूड चेनने आपला ब्रँड अॅम्बेसिडर घोषित केले आहे.
Meet Ram Bahadur Yadav, who looks a lot like Indian opener @SDhawan25. Ram Bahadur hails from Ballia in Uttar Pradesh and works as a computer operator in Lucknow. Ram Bahadur also has a tattoo inked on his forearm which says "My God Shikhar Dhawan". pic.twitter.com/3v0J2NWiEp
— The Times Of India (@timesofindia) May 5, 2020
4.शिखर धवन
भारतीय संघात गब्बर या नावाने ओळखला जाणारा डावखुरा फलंदाज शिखर धवन, आपल्या आक्रमक खेळीने आणि मिश्या पिळण्यासाठी ओळखला जातो. अशा या शिखर धवनचा एक हमशकल आहे. तो उत्तर प्रदेश राज्यातील बलिया येथील रहिवासी आहे. त्याचे नाव राम बहादुर यादव आहे. त्याचा चेहरा हुबेहुब शिखर धवन प्रमाणे आहे. तो लखनऊ मध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने एक टॅटू सुद्धा करवून घेतला आहे. ज्यामध्ये लिहले आहे की, माझा देव शिखर धवन आहे.
Virat Kohli Lookalike In Indore,
Two Virat's=Two Hundreds :p 😉#indiavsNz #INDvNZ pic.twitter.com/hxj8VBgzWf— Dolla Bill (@Trollsnpjs) October 9, 2016
5. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा सुद्धा हमशकल आहे. 2016 साली जेव्हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदौर येथे कसोटी सामना खेळला गेला होता. तेव्हा होळकर स्टेडियमवर विराट कोहलीचा हमशकल पहिल्यांदा दिसला होता.
या सामन्यात विराट कोहलीने दमदार द्विशतक लगावले होते. त्यावेळी समालोचन करत असणाऱ्या संजय मांजरेकरनी विराट कोहलीच्या हमशकललाच विराट कोहली समजले होते. तेव्हा तो म्हणाला होता, ” हे पाहून खूप चांगले वाटत आहे की, द्विशतक झळकावल्यानंतर विराट कोहली चाहत्यांना भेटण्यासाठी मैदानात गेला आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला त्याचे कौतुक करायला हवं. हीच गोष्ट आहे जी त्याला खास बनवते.