“खडकवासला’तून एक अर्ज बाद; 9 उमेदवार रिंगणात
पुणे / कोथरुड – अर्जांच्या छाननीमध्ये कोथरुड विधानसभा मतदार संघातील 4 अर्ज बाद झाले आहेत. तर 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. कोथरुड विधानसभा मतदार संघात एकूण 25 अर्ज दाखल झाले होते. शनिवारी सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली. त्यात नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अर्ज भरले होते, पण त्यासोबत एबी फॉर्म जोडले नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. त्याचबरोबर नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी डमी अर्ज भरल्याने त्यांचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यांचे दोन अर्ज होते.
याशिवाय एका अपक्ष उमेदवाराने डिपॉझिटची रक्कम न भरल्याने त्याचा अर्ज बाद झाला आहे. असे एकूण चार उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता सध्या तरी 21 अर्ज दाखल आहेत. राष्ट्रवादीचे नेते विजय डाकले यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे डाकले आता सोमवारी माघार घेणार, की नाही याबाबत उत्सुकता वाढली आहे.