पोलीस स्टेशनमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अधिकारी निलंबित

मुंबई – पोलीस स्टेशनमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय नारायण सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. तसेच विजयच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चे काढले. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विजय सिंग एका फार्मा कंपनीचा काम करत होता. सोमवारी रात्री जोडप्याच्या वादासंबंधी विजयला वडाळा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस स्टेशनमध्येच विजयला छातीत दुखायला लागले. परंतु, पोलिसांनी केवळ नाटक करत असल्याचे बोलून विजयला मारहाण केली. काही वेळात विजयचे आई-वडील पोलीस स्टेशनमध्ये पोहचले परंतु, त्यांना विजयला भेटू दिले नाही. रात्री २ वाजता विजय जमिनीवर कोसळला असता त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी व नागरिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त करत ठिकठिकाणी मोर्चे काढले आहे.

दरम्यान, पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्याने ही केस सीआयडीला सोपविण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.