पराभवानंतर पंकजा मुंडेंची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी ?

पुणे: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचा त्यांचे चुलत बंधूं धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे. लोकनेत्या अशी ओळख असणाऱ्या पंकजा मुंडेंचा पराभव हा भाजपसाठी धक्काच असल्याचे बोलले जात आहे. परंतु जरी पंकजा यांचा पराभव झाला असला तरी त्यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मोठ्या मताधिक्याने पंकजा यांचा पराभव करत बीड जिल्ह्यात चांगलेच यश मिळवले आहे. धनंजय यांना रोखण्यासाठी पंकजा यांना बाळ द्यावे लागणार असल्याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरु अस्लोयचे बोलले जात आहे. तसेच पंकजा यांच्या पराभवानंतर वंजारी समजत देखील नाराजीचा सूर दिसून येत आहे.

अहमदनगर, पुणे, नाशिक, बुलढाणा आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पंकजा याना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तो भाजप पासून दुरावू नये या साठी त्यांना विधानपरिषदेवर घेत मंत्रिमंडळ देण्यात येणार असल्याची महिपती सूत्रांकडून मिळाली आहे.

तसेच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच टप्प्यात पंकजा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याने त्यांची कॅबिनेट पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

भाजपनेच घडवला पंकजाताईंचा पराभव

दरम्यान पंकजा यांच्या पराभवा नंतर काही आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पंकजा मुंडेयांनी त्यांच्या मतदारसंघातु पोटनिवडनुक लढवण्याचा आग्रह केला होता. या मध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे आणि मोनिका राजळे यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.