नगर – नगर शहर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता मतदान होणार आहे. संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वसाधारण मतदारसंघाच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार, महिला राखीवमध्ये 2 जागांसाठी 3 उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी 3 उमेदवार आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी (25 नोव्हेंबर) भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून घैसास-गुंदेचा पॅनेलचे सुनील रामकृष्ण फळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. सहकारी बॅंकेच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असून अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले. परंतु, त्यात यश आले नाही.
अखेरच्या दिवशी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील 4 उमेदवारांपैकी सारंग मच्छिंद्र क्षेत्रे यांनी अर्ज मागे घेतला तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग मतदारसंघात एका जागेसाठी 3 उमेदवारांचे अर्ज होते. यापैकी दिलीप अडगटला, गणेश विद्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने घैसास-गुंदेचा पॅनेलचे उमेदवार सुनील फळे हे बिनविरोध निवडून आले. नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघातील संजय घुले यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.
आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी बरेच दिवस आहेत. त्यामुळे जोरदार प्रचार केला जाणार आहे. प्रचारात आता सत्ताधारी व विरोधक कोणते मुद्दे घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्रचारानंतर मतदान होणार आहे. निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे आता मतदान होणार आहे. बॅंकेच्या 13 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. शहर बॅंकेसाठी 11 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे.
बॅंकेच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 12 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे कामकाज पाहत आहेत.