पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात तब्बल 1136 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 1077 जणांचा तर शहराबाहेरील 59 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 48 हजार 737 वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1061 वर पोहोचला आहे.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1077 जणांना तर शहराबाहेरील 59 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 14 जण शहरातील असून 3 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 876 वर पोहोचला असून शहराबाहेरील 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 185 इतका झाला आहे.
आतापर्यंत शहरातील 33 हजार 873 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 1840 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 601 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.