वाघोली (पुणे) – बकोरी (ता. हवेली) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून दोन सशस्र अंगरक्षक देण्यात आले आहेत.
वारघडे हे अनेक वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांची माहिती सेवा समिती या नावाची सामाजिक संस्था आहे.
या संस्थेच्या माध्यमातून राज्यभर त्यांचे काम चालू आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यामुळे त्यांचे जीवितास धोका निर्माण झाला होता. काही दिवांपूर्वीच वारघडे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला देखील झाला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप पाटील व गृहविभाग मुंबई यांच्याकडे वारघडे यांनी संरक्षणासाठी अर्ज केला होता.
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर त्याबाबत सखोल चौकशी करून अहवाल पाठवला व त्यानंतर पोलीस अधिक्षक संदिप पाटील साहेब यांनी दोन सशस्र अंगरक्षक देण्याबाबत आदेश केला व चंद्रकांत वारघडे यांना दोन अंगरक्षक मिळाले आहेत.