सातारा -जिल्ह्यातील नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींच्या संख्येने 1400 चा टप्पा पार केला आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शाहूपुरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता. फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता. कराड येथील 63 वर्षीय महिला तसेच राजपुरा ता. सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
276 जण करोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून गुरूवारी संध्याकाळपर्यंत 276 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 379 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 75, कराड 16, फलटण 8, कोरेगाव 60, वाई 29, खंडाळा 12, रायगाव 30, पानमळेवाडी 51, मायणी 15, महाबळेश्वर 6, खावली 21 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 56 अशा एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.