दुबई – संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या जोडीने आता वादळानेही थैमान घातले आहे. या वादळी पावसामुळे आगोदरच विसकळीत झालेल्या अमिरातीचे दैनंदिन व्यवहार आज पूर्णपणे खंडीत झाले. रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाले आहे. तर दुबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील पाण्याखाली गेला आहे. (Dubai Airport Flooded, Flights Diverted After Heavy Rain)
रस्ते आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्ता पूर्ण कोलमडली आहे. दुबईमध्ये आतापर्यंत १९४९ पासून झालेल्या अतिवृष्टीचे सर्व रेकॉर्ड मंगळवारपासूनच्या पावसाने मोडले आहेत.
वादळामुळे बहारीन, कतार आणि सौदी अरेबियामध्येही अतिवृष्टी झाली आहे. मात्र त्यापैक्षा अमिरातीमध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण प्रचंड आहे. अमिरातीत अलिकडेच कृत्रिम पावसासाठी हवाई फवारणी केली गेली होती. त्यामुळे पाऊस जास्त झाल्याचे मानले जाते आहे. भूजल पातळी वाढण्यासाठी अमिरातीत अशाप्रकारे कृत्रिम पाऊस पाडला जात असतो.
Dubai Airport right now
pic.twitter.com/FX992PQvAU— Science girl (@gunsnrosesgirl3) April 16, 2024
मंगळवारपर्यंत संपलेल्या २४ तासात १४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. अमिरातीत सरासरी ९४ मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. दोन दिवसातल्या पावसामुळे वार्षिक सरासरी पण ओलांडली आहे. विमानतळच पाण्याखाली गेल्यामुळे विमानसेवा स्थगित केली गेली आहे. त्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले आहेत.
आशिया खंडातील अरबी द्वीपकल्पात तुलनेने कोरडे हवामान असलेल्या अमिरातीमध्ये तुलनेने एवढा पाऊस असामान्य आहे, परंतु थंड हिवाळ्याच्या महिन्यांत वेळोवेळी येतो. नियमित पाऊस नसल्यामुळे अनेक रस्ते आणि इतर भागात पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते.
शेजारील ओमानमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये १३ जण मरण पावले आहेत. तर अफगाणिस्तानमध्येही अतिवृष्टीमुळे ३३ जण मरण पावले आहेत.