सुरत अग्नितांडव : तीन जणांना अटक 

सुरत- काल गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली होती. या भीषण आगीप्रकणी पोलीस आणि प्रशासनाने दोषींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या अग्नितांडवात २० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० जण गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णायलात उपचार सुरु आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यातील सर्व ट्युशन क्लासेस तात्काळ बंद करण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेतल्यानंतरच क्लासेस पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच गुजरात सरकारने अहमदाबाद, सूरत, राजकोट, वड़ोदरामधील कोचिंग क्लासेसचे सेफ्टी ऑडिट पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)