Mukesh Dalal Lok Sabha Election| मतदानापूर्वीच सूरत लोकसभा मतदार संघात भाजपचे मुकेश दलाल विजयी झाले आहेत. वास्तविक, येथील काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्याचवेळी या जागेसाठी अर्ज दाखल केलेल्या उर्वरित उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. अशा स्थितीत भाजपचे मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला. तर काँग्रेसने याप्रकणावरून भाजपवर सडकून टीका केली आहे.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक बिनविरोध जिंकणारे भाजपचे मुकेश दलाल हे गेल्या 12 वर्षांतील पहिले उमेदवार ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत बिनविरोध विजयी होणारे ते बहुधा भाजपचे पहिले उमेदवार आहेत. सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचा हा पहिलाच विजय आहे.
सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने नीलेश कुंभानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजप उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी दिनेश जोधानी यांनी आक्षेप घेतला होता. उमेदवाराला कोणीही प्रस्तावक नसल्याचा दावा त्यांनी केला. रविवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी करत काँग्रेस उमेदवाराचे अर्ज रद्द केले.
कोण आहेत मुकेश दलाल? Mukesh Dalal Lok Sabha Election|
मुकेश दलाल हे 1981 पासून भाजपशी संबंधित असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. मुकेश यांनी भाजप युवा मोर्चातही काम केले आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सुरत शहर भाजपचे सरचिटणीस आणि SDCA समितीचे सदस्य आहेत. ते सुरत महानगरपालिकेचे (SMC) स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. ते भाजपचे शहर कार्यकारिणी सदस्य, तीन वेळा सुरत महापालिकेचे नगरसेवक आणि चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते शहर भाजपचे सरचिटणीस आहेत. ते सुरत पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्षही राहिले आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात.
मुकेश दलाल यांची एकुण संपत्ती किती ? Mukesh Dalal Lok Sabha Election|
कापड उद्योगाशी संबंधित मुकेश दलाल यांच्याकडे अंदाजे 7.69 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 10.8 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशाप्रकारे पाहिले तर त्यांची एकूण संपत्ती 18.5 कोटी रुपये आहे. मुकेश दलाल यांच्याकडे स्वतःच्या दोन कार आहेत. होंडा सिटी 3.5 लाख रुपये आणि मारुती सुझुकी इग्निस 4.50 लाख रुपये आहे. त्याच्याकडे 8.56 लाख रुपये किमतीचे 130 ग्रॅम सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आहेत.
तर त्यांच्या पत्नीकडे 360 ग्रॅम सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने 23.70 लाख रुपये आहेत. त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 2.47 कोटी रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता 3.93 कोटी रुपये आहे. मुकेश हे वस्त्रोद्योगाशी निगडीत आहेत आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याचे सांगितले आहे. मुकेश दलाल यांनी एमबीए केले असून एलएलबीची पदवीही घेतली आहे.
मुकेश दलाल कसे झाले विजयी? Mukesh Dalal Lok Sabha Election|
सुरत लोकसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नुकताच येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यानंतर एकामागून एक सहा उमेदवारांनी या जागेवरून आपले अर्ज मागे घेतले. फक्त बसपचे उमेदवार प्यारेलाल अर्ज मागे घेण्याचे राहिले होते. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज सकाळी प्यारेलाल सुरत जिल्हा प्रशासन कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी येथून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १० उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
हेही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘हा’ बडा नेता करणार प्रवेश? अजित पवारांची ताकद वाढणार