नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बॅंकेने तोटा कमी करण्यात यश मिळविले आहे. चौथ्या तिमाहीत या बॅंकेला 58 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 524 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सरलेल्या पूर्ण वर्षात बॅंकेला 543 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यापूर्वीच्या वर्षात बॅंकेला 744 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
बॅंकेच्या एनपीएमध्ये आता घट होत आहे. त्यामुळे यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत ही घट होत आहे. त्यामुळे बॅंकेचा तोटा कमी होऊ लागला आहे. पुढील सहा महिन्यांच्या काळात बॅंकेला नफा होण्याची शक्यता असल्याचे बॅंकेने सूचित केले आहे. या तिमाहीत बॅंकेला खराब कर्जापोटी 312 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली.गेल्या वर्षी तरतुदीची रक्कम 768 कोटी रुपये इतकी होती. या तरतुदीमुळे बॅंकेच्या ताळेबंदावर परिणाम झाला.