कोल्हापूरच्या महापौरपदी ‘माधवी गवंडी’ यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर शहरातील व्यक्ती विराजमान झाल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सरीता मोरे यांनी राजीरामा दिला होता.

रिक्तपदाकरीता मंगळवारी महापौरपदाची निवडणुक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. महापौरपदाकरीता माधवी प्रकाश गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड अपेक्षित होती. सभेचे कामकाज सुरु होताच पिठासन अधिकारी मित्तल यांनी निवडणुक कार्यक्रमाचे वाचन केले. निवडणुक प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरीता पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला.

हा अवधी संपताच मित्तल यांनी माधवी गवंडी यांची महापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच गवंडी समर्थकांनी महापालिकेसमोर वाद्यांच्या गजरात गुलाल उधळून तसेच फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. अमन मित्तल, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर सरीता मोरे, हसिना फरास, शोभा बोंद्रे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी गवंडी यांचे अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)