कार्डिफ – पावसामुळे सामन्यातील वेळ वाया गेल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्ताला 41 षटकांत 187 धावांचं आव्हान मिळालं आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही वेळासाठी थांबविण्यात आला होता. पावसामुळं खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 33 षटकांत 8 बाद 182 धावा झाल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर तर लसिथ मंलिगा 4 आणि नुवान प्रदीप शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेचा डाव 36.5 षटकात 201 वर आटोपला. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानला 187 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
Rashid Khan picks up the last wicket of Nuwan Pradeep as Sri Lanka are all out for 201 in Cardiff. Afghanistan have to chase 187 from 41 overs.
Head to @cricketworldcup to follow #AFGvSL live! pic.twitter.com/A6S0t40Vdx
— ICC (@ICC) June 4, 2019
नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानने जिंकला होता. अफगाणिस्तानच्या कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. श्रीलंकेचे सलामीवीर दिमुथ करूणारतने आणि कुसल परेरा यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई करत संघाला सातच्या धावगतीने धावा करून देत संघाला 13.1 षटकांत 92 धावांची मजल मारून दिली. मात्र, मोहम्मद नाबीने दिमुथ करूणारतने (30) याला बाद करत ही सलामीची जोडी फोडली. त्यानंतर दिमुथ करूणारतने आणि लाहिरू थिरिमाने यांनी संघाची धावसंख्या शंभरी पार नेली, मात्र 21 व्या षटकांत लाहिरू थिरिमाने (25) याला मोहम्मद नबीने बाद केले. मात्र त्यानंतर कुसल परेरा (78) यांच्याशिवाय एकही श्रीलंकेचा फंलदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. मधल्या फळीचे फलंदाज कुसल मेंडिस 2, एंजलो मॅथ्यूज आणि धनंजया डि सिल्वा शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
अफगानिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद नाबीने 9 षटकांत 30 धावा देत 4 तर दौलत जादरान, राशिद खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हामिद हसनला 1 गडी बाद करण्यात यश आले.