रत्नागिरी जिल्ह्यातील ८ तलावांच्या संवर्धनासाठी ३ कोटी ८५ लाखांचा निधी वाटप

मुंबई: पर्यावरण विभागातर्फे राष्ट्रीय तलाव सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 8 गावातील तलावांच्या संवर्धनासाठी 3कोटी 85 लाख 26 हजारांचा निधी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आज मंत्रालयात वितरित करण्यात आला.

हा निधी तलावातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, दगडाचे पिचींग करणे, झाडे लावणे, गार्डन तयार करुन नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे,स्वच्छतागृह बांधणे, वॉकिंग ट्रॅक तयार करणे, आदी कामासाठी वापराला जाणार आहे. हा तलाव संवर्धन निधी सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.
रत्नागिरी जिल्ह्यातील   शिरखल तलाव, दापोली,  शिरशिंगे तलाव, दापोली,संवेणी तलाव, खेड,  विन्हे तलाव, मंडणगड, उत्तरेश्वर तलाव, दहागाव,घेरासुमारगड, खेड, आणि विष्णू तलाव, लोणेरे – गोरेगाव (माणगाव) येथील तलावासाठी निधींचे वितरण करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ब्रिटिश कालीन तसेच पुरातन असलेले तलाव प्रदूषणमुक्त तसेच सुशोभित होणार आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.