प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी; पंचायतीतर्फे वृक्षारोपण
कार्ला – पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नव्यानेच उदय जाधव यांनी पदभार स्वीकारला. नवे सीईओ प्रथमच मंगळवारी (दि. 23) मावळ तालुक्यात आले होते. त्यांनी कार्ला ग्रामपंचयतीच्या कामकाज पाहणी करुन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
या वेळी गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, विस्तार अधिकारी दरवडे, मावळ तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे उपस्थित होते. या भेटीदरम्यान कार्ला आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच कार्ला ग्रामपंचयात व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी कार्ला ग्रामपंचयात सरंपच अश्विनी हुलावळे, उपसरपंच अविनाश हुलावळे, माजी उपसरपंच प्रदीप हुलावळे, सदस्या रुपाली हुलावळे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. जी. धोत्रे, पोलीस पाटील संजय जाधव, कार्ला वैद्यकीय अधिकारी भारती पोळ, डॉ. ली. मा. नगरकर, सागर हुलावळे, सनी हुलावळे, तुकाराम हुलावळे यांच्यासह कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते.