नगर – जेवणात मटण बनविले नाही, याचा मनात राग धरून पत्नीस शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुलमोहोर रोडवरील पोलीस चौकीसमोरील साईकुंज अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि.20) घडली.
बाळासाहेब महादेव लोखंडे (रा. साईकुंज अपार्टमेंट, गुलमोहोर रोड पोलिस चौकीसमोर) याने त्याची पत्नी अनिता (वय.35) हिस जेवणात मटन करण्यास सांगितले. परंतु तिने मटन बनविले नाही. याचा राग येऊन बाळासाहेब याने त्याच्या पत्नीस जेवणात मटन का बनविले नाही? असे विचारत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तोफखाना पोलीसांनी अनिता लोखंडे यांच्या फिर्यादीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस गिरीश केदार हे करीत आहेत.