पुणे :– पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल ब्रॉन्झ सिरिज २०२३ स्पर्धेत १० वर्षाखालील मुलांच्या गटात प्रांशुल पुजारी, राजदीप नगरकर, अगस्त्य तापकीर यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल पाषाण रोड या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रांशुल पुजारीने पंधराव्या मानांकित रेयांश जगतापचा ५-१ असा तर, राजदीप नगरकरने तेराव्या मानांकित नील हिरेमठचा ५-२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
चुरशीच्या लढतीत आरूष दिवेकरने श्लोक गोयलवर टायब्रेकमध्ये ५-४(१०-८) असा विजय मिळवला. अगस्त्य तापकीरने चौदाव्या मानांकित वेदांत अगरवालचा ५-१ असा सहज पराभव केला. सोळाव्या मानांकित विहान साबूने अभिमन्यू चव्हाणला ५-२ असे पराभुत केले. विहान मुर्थीने रिशान मोनेचे आव्हान ५-४(२) असे संपुष्टात आणले.