Bangladesh vs Sri Lanka, 1st Test ( Sylhet ) Highlights : – बांगलादेशचा तब्बल ३२८ धावांनी पराभव करत श्रीलंकेने पहिली कसोटी जिंकली. त्यात पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत कामिंडू मेंडीसने शतकी खेळी केली. तसेच त्याने धनंजय डिसिल्व्हासह द्विशतकी भागीदारीही केली. डीसिल्व्हानेही पहिल्या डावात शतक फटकावले होते.
– श्रीलंकेच्या कामिंडू मेंडीसने रचला इतिहास
– सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत फटकावले शतक
– धनंजय डीसिल्व्हासह द्विशतकी भागिदारी
– १४७ वर्षांत पहिल्यांदाच असे’ घडले
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. तिसऱ्या दिवसाचा (रविवार) खेळ संपेपर्यंत बांगलादेशने केवळ ४७ धावांत ५ गडी गमावले होते. सोमवारी खेळ सुरु झाल्यावर त्यांना ४६४ धावांची गरज होती.
या सामन्यात वेगवान गोलंदाज कसून राजिताने ५६ धावांत ५ विकेट घेतल्या, ज्यामुळे श्रीलंकेने सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशला दुसऱ्या डावात १८२ धावांत गुंडाळले आणि ३२८ धावांचा मोठा विजय नोंदवला. बांगलादेशसमोर ५११ धावांचे कठीण लक्ष्य होते.
या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 मधील श्रीलंकेचा हा पहिला विजय आहे. या विजयानंतर श्रीलंकेचा संघ WTC गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला गुणतालिकेत मागे टाकले आहे.
दरम्यान, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेचा फलंदाज कामिंदू मेंडिसने असा विक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.
A thumping 328-run win seals a 1-0 lead in the 2-match Test series. #BANvSL
Who were your standout performers in this match? pic.twitter.com/sMFsiuBIro
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 25, 2024
श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात केवळ ५७ धावांत ५ गडी गमावले होते. त्यानंतर कामिंडू मेंडिस आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात १०२ धावा केल्या आणि धनंजय डी सिल्वासोबत २०२ धावांची भागीदारी केली. डीसिल्व्हानेही शतक करताना १०२ धावा केल्या.
दुसऱ्या डावात मेंडिसला आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि यावेळी त्याने १६४ धावांची खेळी केली. यासह कमिंडू मेंडिस हा कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने ८ व्या किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजी करताना दोन्ही डावात शतके फटकावली आहेत. याशिवाय मेंडिस आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या तीन डावात अर्धशतके फटकावणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या डावातही त्याने ६१ धावा केल्या होत्या.
त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वानेही दोन्ही डावांत शतके फटकावली आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके फटकावणारी मेंडिस आणि डीसिल्वा ही तिसरी जोडी ठरली आहे. त्यांच्या आधी ग्रेग आणि इयान चॅपल यांनी १९७४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती. २०१४ मध्ये मिसबाह उल-हक आणि अझहर अली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही डावात शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. मेंडिस आणि डी सिल्वा यांच्यात पहिल्या डावात २०२ आणि दुसऱ्या डावात १७३ धावांची भागीदारी झाली.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
पहिल्या डावात खेळताना श्रीलंकेने २८० धावा केल्या होत्या, तर बांगलादेश पहिल्या डावात केवळ १८८ धावांवरच मर्यादित होता. कामिंडू मेंडिस आणि धनंजय डीसिल्वा यांची शतके आणि करुणारत्नेच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात ४१८ धावा केल्या. त्यानंतर सोमवारी खेळ सुरु झाल्यावर बांगलादेशचा दुसरा डाव १८२ धावांवर संपला. त्यांच्याकडून मोमीनुल हककने सर्वाधिक ८७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – श्रीलंका पहिला डाव – सर्वबाद २८० धावा. बांगलादेश पहिला डाव – सर्वबाद १८८ धावा. श्रीलंका दुसरा डाव – सर्वबाद ४१८ धावा. बांगलादेश दुसरा डाव – सर्वबाद १८२ धावा. (मोमीनुल हक ८७, मेहदी हसन ३३, कासुन रजिता ५-५६, विश्वा फर्नांडो ३-३६, लाहिरू कुमारा २-३९).