मुंबई – रॉकस्टार यो यो हनी सिंग आपल्या गाण्यांमुळे दुनियाभरामध्ये प्रसिद्ध आहे . यामुळे यो यो हनीच कोणतेही गाणे रिलीज होताच सुपरहिट ठरते सध्याच म्यूजिक सेंसेशन हनी सिंग ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमामध्ये सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशन म्हणून आईफा अवार्डने सन्मानित केले.
या पुरस्कार आपल्या नावे करून, पुन्हा एकदा एका दमदार गाण्यांने ‘बॉलीवूड’ मध्ये दमदार एन्ट्री करत आहे. जॉन इब्राहिम ,पुलकित सम्राट यांचा नवीन सिनेमा. निर्देशक ‘अरशद वारसी’ यांच्या ‘पागलपंती’ या सिनेमामध्ये ‘हनी सिंग’ चे नवीन गाणे ‘ठुमका’ हे त्याच्या चाहत्यांना खूप पसंत पडले आहे. या गाण्याला चाहत्याची चांगलीच दाद दिली आहे.
मागील काही काळ यो यो हनी सिंग आजारी असल्यामुळे कोणतेही गाणे या दरम्यान रिलीज झाले नव्हते.परंतु, आत्ता प्रदर्शित झालेले नवीन गाणे ‘ठुमका’ आत्ता सगळी कसर पूर्ण करताना दिसत आहे.