मुंबई – ‘जितेंद्र जोशी’ पुन्हा एकदा ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमाद्वारे चाहत्यांच्या भेटीस आले आहे.. ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमामध्ये ‘जितेंद्र जोशी’ चाहत्यांचा लाडका ‘जितू’ हा या कार्यक्रमामध्ये मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसत आहे.
या नवीन कार्यक्रमाची ‘कथानक’ हा कलाकारांच्या आयुष्यातील जगासमोर न आलेल्या गोष्टी तसेच गुपिते जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जितेंद्र जोशी यांचे नाटक ‘दोन स्पेशल’ या नाटकामध्ये ‘जितेंद्र जोशी’ मुख्य भूमिकेत दिसून आला होता.
“दोन स्पेशल ”
रंगतदार तरीही खऱ्या खुऱ्या गप्पा!!
आजपासून दर गुरुवारी आणि शुक्रवारी @ColorsMarathi वर
रात्री 9.30 वा. pic.twitter.com/lsSQdYaLww— Jitendra Joshi (@jitendrajoshi27) October 31, 2019
याच नाटकावरून कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे. मराठी बरोबरच हिंदीमध्ये अनेक गप्पांचे कार्यक्रम आले असून, ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम रोजच्या मुलाखतीच्या कार्यक्रमापेक्षा खूप वेगळा असणार आहे.
View this post on Instagram
‘जितेंद्र जोशी’ नेहमीच आपल्या कलाकृतीने पडदयावर धमाल काम करताना दिसून येतो. या कार्यक्रमध्ये जितेंद्र जोशी काय नवीन करणार आहे हे पाहण्याजोगे ठरेल.आपल्या ट्विटर द्वारे सुद्धा ‘जितेंद्र’ जोशी यांनी ट्विट केले आहे.आणि फोटोज शेअर करून ,आपल्या ट्विटर द्वारे या शो बद्दल सांगितले आहे.