IND vs ENG Test Series, Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालचा शानदार फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही कायम आहे. या मालिकेत तो इंग्लिश गोलंदाजांसाठी अडचणीचा ठरला आहे. यशस्वी जैस्वालने मालिकेतील 4 कसोटी सामन्यांमध्ये 93.57 च्या सरासरीने 655 धावा केल्या आहेत. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हा युवा सलामीवीर अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी, आता यशस्वी जैस्वालला फेब्रुवारीसाठी आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी नामांकन मिळाले आहे. याशिवाय न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निशंका यांनाही नामांकन मिळाले आहे. आयसीसीने आजच (सोमवार,दि.4) फेब्रुवारी 2024 च्या प्लेअर ऑफ द मंथसाठी ( ICC Player of The Month award for February 2024 ) नामांकित खेळाडूंची नावे जाहीर केली असून आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ फेब्रुवारीचा विजेता या आठवड्यात जाहीर केला जाईल.
🇮🇳 🇱🇰 🇳🇿
Revealing the ICC Men’s Player of the Month shortlist for February 2024.
— ICC (@ICC) March 4, 2024
या शर्यतीत यशस्वी जैस्वालचे नाव आघाडीवर असून तो प्रबळ दावेदार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यानं पाठोपाठ दुहेरी शतक झळकावले आहे. जैस्वाल इंग्लंडविरुद्ध अव्वल फॉर्ममध्ये होता, त्याने विझागमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले आणि त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक झळकावून भारताला मालिकेत आघाडी घेण्यास मदत केली.
मात्र न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निशंका यांच्यात कडवी स्पर्धा आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पथुम निशांकाने शानदार द्विशतक झळकावले. वनडे फॉरमॅटमध्ये श्रीलंकेसाठी द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. पथुम निशांकाने अफगाणिस्तानविरुद्ध 210 धावांची इनिंग खेळली होती.
त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने शानदार फलंदाजी सादर केली. केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिका मालिकेतील 4 डावात 403 धावा केल्या.
यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निशंका हे आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारी पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. मात्र, या तीनपैकी कोणत्या फलंदाजाची आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारी पुरस्कारासाठी निवड होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.