Delhi Budget 2024 । दिल्ली सरकारने आपल्या राज्यातील सर्व महिलांना दरमहा एक हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ नावाने ही मदत येाजना लागू केली जाणार आहे.
“२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महिला कल्याणासाठी २७१४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. महिलांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’अंतर्गत २००० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अनुसुचित जाती, जमाती आणि ओबीसी कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी ६२१६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०१४ मध्ये दिल्लीचा जीएसडीपी ४.९५ लाख कोटी रुपये होता. । Delhi Budget 2024
आणि गेल्या दहा वर्षांत दिल्लीचा जीएसडीपी अडीच पटीने वाढून तो आता ११.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०१४ मध्ये दिल्लीचे दरडोई उत्पन्न होते. 2.47 लाख रुपये आणि आज दिल्लीचे दरडोई उत्पन्न ४.६२ लाखांवर पोहोचले आहे जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा अडीच पट जास्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबप्रमाणे दिल्लीत ऑनलाइन अर्जप्रक्रिया नसून, केवळ ऑफलाइन स्वरूपात ती राबवली जाऊ शकते. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या, आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत रक्कम मिळणार नाही.
इतर सर्व महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला एक हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेचे लाभ मिळवण्यासाठी महिला दिल्लीची रहिवासी असणं आवश्यक आहे. महिलेकडे दिल्लीतलं आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असावं.