Unwanted Record in Cricket : क्रिकेटच्या खेळात आपल्याला अनेकदा काहीतरी अनोखे पाहायला मिळते किंवा अशा अनेक रंजक किस्से ऐकायला मिळतात, जे तुम्ही याआधी कदाचितच ऐकले असतील. क्रिकेटशी संबंधित असाच एक रंजक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. एका गोलंदाजाने फक्त 4 चेंडूत 92 धावा दिल्या आणि त्यानंतर त्याच्यावर 10 वर्षांची बंदी कशी घालण्यात आली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बांगलादेशच्या सेकंड डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये ही घटना घडली. या स्पर्धेत शिओम आणि लालमाटिया यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाज सुजोन महमूदने अवघ्या 4 चेंडूत 92 धावा दिल्या. लालमटियाचा गोलंदाज सुजन महमूदने 65 वाईड आणि 15 नो बॉलसह 92 धावा दिल्या होत्या. गोलंदाजाने त्याच्या 4 लीगल चेंडूंमध्ये केवळ 12 धावा दिल्या होत्या. या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुजन महमूदवर ( Sujon Mahmood ) तब्बल 10 वर्षांची बंदी घातली.
पंचाच्या निषेधार्थ केले ‘हे’ कृत्य…
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता सुजोन महमूदने हे जाणूनबुजून केल्याचे निष्पन्न झाले. वास्तविक सुजोन याने पंचांना विरोध दर्शविताना अशी कामगिरी केली आणि अशा प्रकारे हा लाजिरवाणा विक्रम झाला.
4 चेंडूत 92 धावा, वाइड-नो बॉल देताना अंपायरची (पंच) दमछाक…
एखादा गोलंदाज फक्त 4 चेंडूत 92 धावा देऊ शकतो का? हे विचित्र वाटते, नाही का? तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे. ही एप्रिल 2017 सालची घटना आहे. बांगलादेशच्या एका क्लब क्रिकेटपटूने ढाका सेकंड डिव्हिजन क्रिकेट लीग दरम्यान चार लीगल चेंडूंमध्ये 92 धावा देताना भरपूर नो बॉल आणि वाईड बॉल टाकले. लालमटिया क्लबच्या सुजोन महमूदने ( sujon mahmud 92 runs ) ऍक्झिओम क्रिकेटर्स संघाविरुद्ध गोलंदाजी करताना 13 वाईड्ससह 15 नो बॉल टाकले, जे सीमेपलीकडे गेले.
त्याच्या चार लीगल चेंडूंत 12 धावा दिल्या गेल्या. या सामन्यात ऍक्झिओम क्लबने 10 गडी राखून विजय मिळवला होता.
नेमंक काय घडलं….
वास्तविक, या सामन्यात लालमाटिया क्लब ( Lalmatia Club ) संघाच्या विरोधात गेलेल्या पंचांच्या अनेक निर्णयांमुळे नाराज होता. संघाने फलंदाजी केली आणि लालमाटिया क्लब 88 धावांवर सर्वबाद झाला. याची सुरुवात नाणेफेकीने झाली. या सामन्यात कर्णधाराला नाणेफेकीनंतर नाणे बघू दिले गेले नाही आणि लालमाटिया क्लबला प्रथम फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि या दरम्यान पंचांचे अनेक निर्णय संघाच्या विरोधात गेले होते. त्यामुळे या प्रकरणावर खेळाडू संतप्त झाले होते.
50 षटकांच्या सामन्यात लालमाटिया क्लब 14 षटकांत 88 धावा करून बाद झाला. यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाने अवघ्या 4 चेंडूत एकही विकेट न गमावता 92 धावांपर्यंत मजल मारली होती. सुजोनने पहिल्याच षटकात 13 वाइड आणि तीन नो-बॉल टाकले, जे सर्व सीमारेषेपर्यंत पोहोचले. अशाप्रकारे विरोधी संघाला अतिरिक्त 80 धावा मिळाल्या.
अशा अवैध चेंडूंवर फलंदाज धावा काढू शकतात, परंतु गोलंदाजाच्या नियमित सहा चेंडूंच्या षटकांमध्ये त्यांची गणना केली जात नाही. ऍक्झिओमचा सलामीचा फलंदाज मुस्तफिझूर रहमानने सुजोनच्या चार वैध(लीगल) चेंडूंवर तीन चौकार मारून आपल्या संघाला ढाका येथे अवघ्या 0.4 षटकांत विजय मिळवून दिला होता.
या संपूर्ण स्पर्धेत अंपायरिंगबाबत (पंच) वाद पाहायला मिळाला होता. आणखी एक उदाहरण म्हणजे याच स्पर्धेतील आणखी एका सामन्यात फियर फायटर्स स्पोर्टिंग क्लबच्या तसनीम हसननेही अंपायरिंगच्या निषेधार्थ 7 वैध चेंडूत 69 धावा देत असेच काहीसे केले होते.
एका षटकात सर्वाधिक 77 धावा…
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 36 आहे. प्रत्येक चेंडूवर एक षटकार – जे दोन्ही मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये घडले आहे, परंतु कधीही कसोटी सामन्यात नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 77 धावा देण्याचा विक्रम आहे. वेलिंग्टनच्या रॉबर्ट व्हॅन्सने 1990 मध्ये कँटरबरीविरुद्ध एका षटकात 77 धावा दिल्या होत्या.