यामी गौतमने इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे सगळे फोटो मेकअप न करता काढलेले आहेत. हे फोटो उपचार करण्यापूर्वीचे आहेत.
कारण आपल्याला कॅरॅटोसिस पायलॅरिस नावाचा एक त्वचाविकार आहे, असे यामी गौतमने सांगितले आहे. यावर यामीने खूप उपचार केले. अखेर तिने स्वतःला समजावले आणि या विकारासोबतच राहायचे ठरवून टाकले.
या विकारामध्ये त्वचेवर लहान लहान उंचवटे येतात. मात्र, ते इतके छोटे असतात की सहज लक्षात येऊ शकत नाहीत. अगदी नवतरुणी असल्यापासून आपल्याला हा विकार आहे आणि अजूनही तो पूर्णपणे बरा झालेला नाही, असे यामीने सांगितले. आता या विकाराबद्दल आपल्याला भीती किंवा अनास्था वाटत नाही, तर आपण ते पूर्णपणे स्वीकरल्याचेही तिने सांगितले.
यामीने ही बाब स्वतःहून आपल्या फॅन्सना सांगितली आहे. हे तिचे धाडसच म्हणायला पाहिजे. एरवी फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला असा काही आजार असेल, अशी कोणाला शंकाही वाटली नसती.
यामीचे “दसवी’, “अ थर्स्टडे’ आणि “लोस्ट’ हे रिलीज होण्यासाठी सिद्ध झाले आहेत. याशिवाय “ओ माय गॉड 2′, “धूम धाम’ आणि “चोर निकलके भागा’ निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत.