मुंबई – अक्षयकुमारच्या “ओह माय गॉड’च्या सिक्वेलचे लवकरच शूटिंग सुरू होणार आहे, असे समजले होते. या सिनेमामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या अफलातून केमिस्ट्रीने धमाल उडवून दिली होती. आता सिक्वेलमध्ये मात्र परेश रावल असणार नाही. कारण परेश रावलने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे.
मानधनाच्या मुद्द्यावरून त्याने हा सिनेमा नाकारला असल्याचे समजते आहे. “ओह माय गॉड’ च्या पहिल्या भागात परेश रावलच लीड ऍक्टर होता. तसेच या सिनेमाच्या यशामध्येही त्याचाच सहभाग अधिक होता. म्हणूनच परेश रावलने आपले मानधन वाढवले आहे आणि निर्मात्यांना ते परवडू शकले नाही. त्याने निर्मात्यांपुढे प्रॉफिट शेअरींगचा दुसरा पर्याय ठेवला होता.
मात्र तो सौदा देखील होऊ शकला नाही, तेंव्हा परेश रावलने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. आता परेश रावलच्या जागेवर निर्मात्यांनी पंकज त्रिपाठीला घेतले आहे, असे समजते आहे. सिक्वेलमध्ये पंकज त्रिपाठीची एन्ट्री केल्यामुळे आता कथेत थोडा फेरबदल केला जाऊ शकेल. अक्षय सध्या लंडनमध्ये “मिशन सिंड्रेला’चे शुटिंग करतो आहे. ते संपले की तो शूटिंगला उपलब्ध होणार आहे.