मुंबई – करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेश गल्ली येथील ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘देश हाच देव’ मानून यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत.
यंदा लालबाग राजाच्या मंडपात मोठ्या प्रमाणात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं आयोजित केली आहे. या शिबीरात जाऊन एका वेगळ्या पद्धतीनं बॉलिवूड सेलिब्रिटीनं आपली श्रद्धासुमनं अर्पण केल्याचं पाहायला मिळालं. नुकतंच बॉलिवूड मधील लोकप्रिय आणि आघाडीचा नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा ने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन रक्तदान केलं.
तसेच, रक्तदान करण्यासाठी म्हणून आलेल्या रेमोनं मास्क, हेड कव्हर, अल्होहोल व्हाईप्स, ग्लोव्ह्ज, शू कव्हर आणि सॅनिटायझर अशी आवश्यक सामग्री सुद्धा दान केली. सध्या सोशल मीडियावर रेमोचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे.