Bajrang Punia, Ravi Dahiya eliminated from Paris 2024 Olympics qualification race – भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया ( Bajrang Punia ) याला पॅरिस ऑलम्पिक पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेतच पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंगने ब्रॉंझपदक मिळवले होते, मात्र त्याला निवड चाचणीत रोहित कुमारने ६५ किलो फ्रीस्टाइल वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभूत केले. उपांत्य फेरीत रोहितने पुनियाला ९-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. आता अंतिम लढत रोहित आणि सुजीत यांच्यात लढत होणार आहे.
तर दुसरीकडे टोकियो ऑलिम्पीकचा रजतपदक विजेता रवि दहिया ( Ravi Dahiya ) यालाही परभवाचा सामना करावा लागला आहे. ५७ किलो फ्रीस्टाइल वजनी गटात उदित याने त्याला १०-८ अशा फरकाने पराभूत केले. ही निवड चाचणी जिंकणार्या खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पीक पात्रतेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच आता रवि दहिया आणि बजरंग पूनिया यांना ऑलम्पिकमध्ये खेळता येणार नाही. या चाचणी स्पर्धेचे आयोजन सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधीकरणाने (साई) केले होते.
बजरंग पुनिया भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये सहभागी होता. बजरंगने काही दिवसांपूर्वी यूनायटेड वर्ल्ड रेसलिंगला एक पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसातच युनायटेड रेसलिंगने मात्र, भारतीय कुस्ती महासंघावरील लावलेली बंदी मागे घेतली होती.
बजरंग पुनिया याने २०१९ साली कझाकिस्तान येथे नूर सुल्तानमध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत उपांत्व फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळी या कामगिरीच्या जोरावर तो २०२० सालच्या टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरला होता. त्यात त्याने ब्रॉंझपदक जिंकले होते. जागतिक स्पर्धेतील त्याचे हे तिसरे पदक ठरले होते. आता मात्र, तो पॅरिस ऑलिम्पिक खेळू शकणार नसल्याचे त्याचे व दहिया यांचे ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे स्वप्न भंग झाले आहे.