Nana Patekar On loksabha 2024 : अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळ आणि नाम फाऊंडेशनच्या कार्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते. अशात नाना पाटेकर यांना पत्रकारांनी तुम्ही शिरूरमधून लोकसभा लढणार का ? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल.
लोकसभेचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार असल्यामुळे या मतदारसंघाची चर्चा देशभर सुरु आहे. बारामतीनंतर शिरूर लोकसभेची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.शिरूरमधून खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का ? असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांना नुकताच माध्यम कर्मींनी विचारला. | Nana Patekar On loksabha 2024
“मी खूप ठिकाणी निवडणूक लढणार अशा चर्चा ऐकतोय.. मला नेमकं सांगा कि मी कुठून निवडणूक लढणार आहे.” अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी नाना पाटेकर यांनी दिली. अमोल कोल्हेंच्या विरोधात लोकसभा लढणार का ? असं विचारल असता नाना म्हणाले,”राजकारण हा माझा प्रांत नाही. कारण तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही.” | Nana Patekar On loksabha 2024
राजकारणात गेल्यावर ते मनात आलेलं बोलू देतील कि नाही हे माहिती नाही. त्यामुळे नामच्या माध्यमातून काम करत आहोत आणि लोकांच्या संपर्कात आहोत असं देखील नानांनी यावेळी सांगितले. तसेच उत्तर प्रदेश आणि गुवाहाटी या राज्यांमध्येही आम्ही ही मोहीम घेऊन जात आहोत असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले. | Nana Patekar On loksabha 2024