Murali Sreeshankar ( Paris Olympics 2024 ) : – यंदा पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला फारसा वेळ शिल्लक नाही. या खेळांमधील भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार लांब उडीपटू आणि पॅरिसमध्ये पदकाचा दावेदार मानला जाणारा मुरली श्रीशंकर या स्पर्धेत सहभागी होणार नाही. दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे शक्य नसल्याचे श्रीशंकरने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला प्रशिक्षणा दरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून तो बाहेर पडला आहे. यामुळे त्याला 2024 च्या संपूर्ण मोसमाला मुकावे लागणार आहे. आशियाई खेळ आणि कॉमनवेल्थ गेम्स रौप्यपदक विजेत्या श्रीशंकरने 2023 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवताना 8.37 मीटर उडी नोंदवून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता.
Asian and Commonwealth Games silver-winning long jumper Murali Sreeshankar ruled out of Paris Olympics due to knee injury which would require surgery. #Olympics pic.twitter.com/F7ytAX3INr
— Press Trust of India (@PTI_News) April 18, 2024
या 25 वर्षीय खेळाडूची 27 एप्रिल आणि 10 मे रोजी अनुक्रमे शांघाय/सुझोऊ आणि दोहा येथे बॅक-टू-बॅक डायमंड लीग मीटिंगसह त्याच्या हंगामाची सुरुवात होणार होती. पण मंगळवारी सरावादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याचे ऑलिम्पिक स्वप्न संपुष्टात आले.
“दुर्दैवाने, जे दुःस्वप्न वाटत असले तरी वास्तव आहे, माझे पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न संपले आहे” असे श्रीशंकरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.