Women’s Premier League 2024, Purple Cap : महिला प्रीमियर लीगचा शेवटचा सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने दमदार कामगिरी करत गुजरातवर सात गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना 17 मार्च रोजी होणार आहे, तर स्पर्धेतील एलिमिनेटर सामना 15 मार्च रोजी मुंबई आणि RCB यांच्यात होणार आहे.
दिल्लीचे तीन गोलंदाज पर्पल कॅपच्या शर्यतीत…
महिला प्रीमियर लीगचे दुसरे सत्र आतापर्यंत दिल्लीच्या गोलंदाजांच्या नावावर आहे. संघाचे तीन गोलंदाज पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. या यादीत मॅरिझान पहिल्या क्रमांकावर आहे जिने 11 विकेट घेतल्या आहेत. तर तिस-या क्रमांकावर जेस जोनासन तितक्याच विकेटसह आहे.
या यादीत दिल्लीची गोलंदाजही चौथ्या क्रमांकावर आहे. राधा यादवने 10 विकेट घेतल्या आहेत. जेस जोनासेन आणि राधा यादव यांना अंतिम सामन्यात मारिजनेपेक्षा जास्त विकेट्स घेऊन अव्वल स्थान गाठण्याची संधी असेल.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दोन भारतीयांचा समावेश…
दोन भारतीय खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. यामध्ये शेफाली वर्मा 265 धावांसह चौथ्या स्थानावर तर स्मृती मानधना 259 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. तर यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा 295 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, आता त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाची 31 वर्षीय फलंदाज आठ सामन्यांत 308 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी 285 धावांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.