WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Final 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात गोंलदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रातील उत्त्कृष्ट कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट आणि 3 चेंडू राखून विजय मिळवत महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावलं. यासह महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळाला आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात 113 धावा केल्या. आरसीबीने 19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजेतेपद मिळवले.
The Smriti Mandhana-led Royal Challengers Bangalore reign supreme! 🏆
Presenting before you – Champions of the #TATAWPL 2024 ! 🙌 🙌
Congratulations, #RCB! 👏 👏#DCvRCB | #Final | @RCBTweets | @mandhana_smriti pic.twitter.com/mYbX9qWrUt
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 17, 2024
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने योजनेत बदल करत अंतिम फेरीत स्मृती मंधानासह सोफी डिव्हाईनला सलामीला पाठवले. दिल्ली कॅपिटल्ससमोर 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला 8.1 षटकात 49 धावांवर पहिला धक्का देत सलामीवीर सोफी डिव्हाईनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दिल्लीसाठी शिखा पांडेने डिव्हाईनला बाद केले. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेली डिव्हाईन 27 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह 32 धावा करून बाद झाली.
यानंतर एलिस पेरी मानधनाला साथ देण्यासाठी आली. यावेळी दोघीही संथ फलंदाजी करत होत्या. त्यामुळे चेंडू कमी झाले व धावा जास्त हव्या अशी परिस्थिती निर्माण झाली. तसेच स्थिरावलेली मानधनाही 31 धावा काढून बाद झाली. तिने 39 चेंडूत 3 चौकार फटकावले. मात्र, यावेळी पेरीने रिचा घोषला साथीला घेत आवश्यक धावगती राखली. एलिस पेरी हिने 37 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 35 धावा करून तर रूचा घोष हिने 14 चेंडूत दोन चौकारासह नाबाद 17 धावा करत संघाचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयंका पाटील आणि मोलिनक्सच्या शानदार गोलंदाजींच्या जोरावर आरसीबीने दिल्लीचा डाव 18.3 षटकांत 113 धावांवर गुंडाळला.
Innings Break!
A sensational bowling display from @RCBTweets! 👌 👌
4⃣ wickets for @shreyanka_patil
3⃣ wickets for Sophie Molineux
2⃣ wickets for Asha ShobanaCan @DelhiCapitals bounce back? 🤔
Stay Tuned ⌛️
Scorecard ▶https://t.co/g011cfzcFp#TATAWPL | #DCvRCB | #Final pic.twitter.com/xl1YFMHVHA
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 17, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या संघाला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणले, मात्र आठवे षटक टाकण्यासाठी आलेली डावखुरी फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचा डाव खिळखिळा केला.
शेफालीचे अर्धशतक हुकले, तिने 27 चेंडूत 2 चौकार अन् 3 षटकारासह 44 धावा केल्या. तर कर्णधार मेग लॅनिंग हिने 23 चेंडूत 23 धावा केल्या.जेमिमा आणि एलिस कॅप्सी हिला खातेही उघडता आले नाही. यानंतर श्रेयंका पाटीलने दिल्लीच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. दिल्लीची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद 64 धावा करणारा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 113 धावांवर सर्वबाद झाला. मारिजाने कॅप आठ धावा केल्यानंतर, जेस जोनासेन तीन धावा करून आणि मिन्नू मणी पाच धावा करून बाद झाली. अरुंधतिने 10 आणि राधा यादव हिने 12 धावांची खेळी केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-winner-prize-money-winner-and-runner-up-will-get-so-many-crores-know-the-prize-money/
आरसीबीतर्फे श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट घेतल्या तर राधा यादव धावबाद झाली.