RCB Broke Virat Kohli Record : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स (DC) चा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयासह बंगळुरू संघाने विराट कोहलीचा एक विक्रम उद्ध्वस्त केला. हा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा नव्हे, तर सोशल मीडिया बाबतीतला एक खास विक्रम मोडला गेला, जो यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर होता.
खरं तर, RCB ने इंस्टाग्राम पोस्टवर सर्वात जलद 1 दशलक्ष लाईक्सचा विक्रम केला आहे, जो यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर होता. आरसीबीच्या ( RCB Instagram Account ) विजयी पोस्टला अवघ्या 9 मिनिटांत 10 लाख लाईक्स मिळाले. तर विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम 10 मिनिटांचा होता. कोहलीच्या एका पोस्टला 10 मिनिटांत सर्वात जलद 1 दशलक्ष लाईक्स मिळाले होते.
9 मिनिटांत एका पोस्टवर 1 दशलक्ष लाईक्स पूर्ण करणारे RCB चे Instagram हे पहिले भारतीय खाते ठरले. यापूर्वी, कोहलीचे खाते 1 दशलक्ष लाईक्स मिळवणारे सर्वात जलद भारतीय इंस्टाग्राम खाते होते.
Fastest to 1M likes in India on Instagram:
RCB – 9 mins.
Virat Kohli – 10 mins.
Elvish Yadav – 11 mins.
Virat Kohli – 12 mins.
Virat Kohli – 12 mins.
Virat Kohli – 13 mins.
Virat Kohli – 14 mins. pic.twitter.com/JpeAz1dBXR— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 18, 2024
आरसीबी फ्रँचायझीने पटकावले पहिले विजेतेपद….
आरसीबी फ्रँचायझी स्थापन होऊन 16 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. फ्रँचायझीने 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून सुरुवात केली, परंतु 2024 मध्ये पहिले विजेतेपद जिंकले. फ्रँचायझीची सुरुवात 2008 मध्ये पुरुष संघाने झाली, परंतु महिला संघाने त्यांना पहिले विजेतेपद पटकावून दिले.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
आरसीबी महिला संघ 2023 मध्ये लॉन्च करण्यात आला, जेव्हा महिला प्रीमियर लीग सुरू झाली. आयपीएलचे 16 हंगाम खेळूनही आरसीबीच्या पुरुष संघाला विजेतेपद मिळवता आले नाही, परंतु लीगच्या दुसऱ्या सत्रातच या फ्रँचायझीच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले.