Most Wickets, Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती सुरू आहे. 4 मार्चपर्यंतचे सर्व सामने बेंगळुरूमध्ये खेळले गेले, त्यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सर्व सामने खेळवले जातील. लीग टप्पे संपले आहेत, आता क्वालिफायर 1 आणि अंतिम सामना बाकी आहे. येथे आम्ही तुम्हाला त्या 5 गोलंदाजांबद्दल सांगत आहोत ज्यांनी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये अंतिम सामन्यासह एकूण 22 सामने खेळले जातील. 20 सामने खेळल्यानंतर, स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू दिल्ली कॅपिटल्सची जेस जोनासन आहे. तिने 6 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. तिच्याकडे सध्या पर्पल कॅप आहे.
जेस जोनासेन (दिल्ली कॅपिटल्स) : 6 सामने 11 बळी
मारिजाने कॅप (दिल्ली कॅपिटल्स) : 6 सामने 11 बळी
सोफी एक्लेस्टोन (यूपी वॉरियर्स) : 8 सामने 11 बळी
दीप्ति शर्मा (यूपी वॉरियर्स) : 8 सामने 10 बळी
राधा यादव (दिल्ली कॅपिटल्स) : 8 सामने 10 बळी
महिला प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती 23 फेब्रुवारीपासून सुरू झाली. लीग टप्प्यातील सामने 13 मार्चपर्यंत संपले. सर्व सामने संपल्यानंतर गुणतालिकेत अव्वल असणारा संघ दिल्लीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
15 मार्च रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये प्लेऑफ सामना होईल, ज्यातील विजयी संघ दुसरा अंतिम फेरीतील खेळाडू असेल. WPL 2024 चा अंतिम सामना 17 मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.