WPL Live Cricket Score, MI vs RCB, Eliminator 2024 : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवारी महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या चुरशीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा 5 धावांनी पराभव केला आहे.
महिला प्रीमिअर लीगमधील शुक्रवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरु व मुंबई इंडियन्स याच्यातील एलिमिनेटरचा सामना क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक ठरत होता. कर्णधार हरमनप्रीत कौर व अमेलि केर यांच्या अफलातून खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. बंगळुरुने हा सामना 5 धावांनी जिंकला. आता येत्या रविवारी विजेतेपदाचा सामना बंगळुरु व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. आरसीबी पहिल्यांदाच या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे.
𝗠𝗮𝗶𝗱𝗲𝗻 #𝗧𝗔𝗧𝗔𝗪𝗣𝗟 𝗙𝗶𝗻𝗮𝗹 𝗳𝗼𝗿 𝗥𝗖𝗕 👏@RCBTweets secure a 5-run win over #MI in an edge of the seat thriller in Delhi 📍🤝
They will now play @DelhiCapitals on 17th March! ⌛️
Scorecard ▶️https://t.co/QzNEzVGRhA#MIvRCB | #Eliminator pic.twitter.com/0t2hZeGXNj
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2024
बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 136 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अडखळत झाली. हेली मॅथ्युज 15, यस्तिका भाटीया19, नॅट शिव्हर ब्रंट 23 यांनी बेजबाबदार फटके खेळत आपल्या विकेट बहाल केल्या. ही पडझड कर्णधार हरमनप्रीत कौरने थांबवली. तिने अमेली केरच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी मुंबई हा सामना सहज जिंकेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, त्याचवेळी कर्णधार हरमन बाद झाली व सामन्याला कलाटणी मिळाली.
हरमन 30 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावांवर बाद झाली. दुसरीकडे केर सावध फलंदाजी करत होती. महत्वाच्या क्षणी एस. संजना व पुजा वस्त्रकार यांनी साफ निराशा केली. यावेळी त्यांना विजयाठी 2 चेंडूत 8 धावांची गरज होती. या धावा काढणे केर व अमनज्योत कौरला जमले नाही व मुंबईने हा सामना 5 धावांनी गमावला. केर 25 चेंडूत 2 चौकारांसह 27 धावांवर नाबाद राहिली. बंगळुरुकडून श्रेयांका पाटीलने सर्वाधिक 2 गडी बाद केले. सोफी मोलिन्यूक्स, एलिस पेरी, शोभना आशा आणि जॉर्जिया वेयरहैम यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
तत्पूर्वी, आरसीबीची कर्णधार मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत सहा गडी गमावून 135 धावा केल्या. एलिस पेरीने आरसीबीसाठी 50 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान तिच्या बॅटमधून आठ चौकार आणि एक षटकार आला.
Innings Break!
A brisk @EllysePerry FIFTY guides @RCBTweets to 135/6. 👍
Stay Tuned for the @mipaltan‘s chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/QzNEzVGRhA#TATAWPL | #MIvRCB | #Eliminator pic.twitter.com/SpkGdkSZuM
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2024
या सामन्यात आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामी देण्यासाठी आलेल्या स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन या संघाची धावसंख्या 20 असताना बाद झाल्या. आरसीबीने तीन चेंडूंत दोन विकेट गमावल्या. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हेली मॅथ्यूजने सोफी डिव्हाईन हिला आपले बळी बनवले. तर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नताली सिव्हर ब्रंटने कर्णधार स्मृती मानधना हिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन या प्रत्येकी 10 धावा काढून माघारी परतल्या.
याव्यतिरिक्त मुंबईविरुद्ध आरसीबीकडून दिशा कासट शून्य, ऋचा घोष 14 धावा, सोफी मोलिनक्स 11 धावा काढून बाद झाल्या. जॉर्जिया आणि श्रेयंका अनुक्रमे 18 आणि तीन धावा करून नाबाद राहिल्या.
या सामन्यात मुंबईचे गोलंदाजी आक्रमण आरसीबीसाठी आपत्तीजनक ठरले. हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रंट आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.