Live Cricket Score, MI vs RCB Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज (गुरूवार, 11 एप्रिल) 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं आरसीबीच्या पाच विकेट घेतल्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईनं आरसीबीविरूध्द सात विकेटनं विजय मिळवला आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंगळुरूने 20 षटकांत आठ गडी गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 15.3 षटकांत तीन गडी गमावून 199 धावा केल्या अन् विजय साकारला.
आरसीबीने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. मुंबईला पहिला धक्का 8.5 षटकात 101 धावसंख्येवर बसला. आकाश दीपने इशान किशनला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. त्याने 34 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारासह 69 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्यानंतर 12 षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 139 धावसंख्येवर मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा 24 चेंडूत 3 चौकार अन् 3 षटकाराह 38 धावा करून झेलबाद झाला. विल जॅकने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रीस टोपलेने रोहितचा अप्रतिम झेल घेतला.सूर्यकुमार यादवनं दुखापतीनंतर कमबॅक करताना दुसऱ्याच मॅचमध्ये शानदार फटकेबाजी केली.
मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने स्फोटक कामगिरी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकले. या स्टार फलंदाजाने 273.68 च्या स्ट्राईक रेटने 52 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि चार षटकार आले. त्याला विजयकुमार विशाकने लोमराच्या हाती झेलबाद केले.
मुंबईच्या टॉप ऑर्डरनं चांगली खेळी केल्यानं नंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मानं विजयावर सहजपणे नाव कोरलं.चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 23 धावांची नाबाद भागीदारी झाली. कर्णधाराने सहा चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. त्याचवेळी टिळक वर्माने 10 चेंडूत 16 धावा केल्या. आरसीबीतर्फे आकाश दीप, विजयकुमार विशाक आणि विल जॅक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीची संधी दिली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईविरुद्ध 20 षटकांत आठ गडी गमावून 196 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
Innings Break!
Fifties from Faf du Plessis (61), Rajat Patidar (50) & Dinesh Karthik(53*) guide #RCB to a total of 196/8.
Scorecard ▶️ https://t.co/Xzvt86cbvi#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/wcFqYPK8Kx
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
बेंगळुरूकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.. तर रजत पाटीदारने अर्धशतक झळकावले. या सामन्यात विराट कोहलीला केवळ तीन धावा करता आल्या. 14 धावांवर बुमराहने त्याला आपला शिकार बनवले. या वेगवान गोलंदाजाने कोहलीला आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाद केले. विल जॅकच्या रूपाने मुंबई संघाला दुसरी विकेट मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात जॅकला केवळ आठ धावा करता आल्या. त्याला 23 धावांवर आकाश मधवालने बाद केले.
यानंतर फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची मोठी भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने मोडली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या पाटीदारला त्याने यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले. रजत पाटीदारने 26 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याने 192.30 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि चार षटकार मारले. यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलची विकेट पडली जो शून्यावर बाद झाला. या सर्व मोसमात त्याची बॅट प्रभावी ठरली नाही.
आरसीबीविरूध्द बुमराह सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार फाफ डुप्लेसिसला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने महिपाल लोमराला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर या वेगवान गोलंदाजाने 19व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. त्याने सौरव चौहान आणि विजयकुमार विशाक यांना बाद केले. यासह त्याने पाच विकेट्स मिळवण्याची कामगिरी केली.
त्याचवेळी या सामन्यात दिनेश कार्तिकने दमदार कामगिरी केली. त्याने 22 चेंडूत 21 वे अर्धशतक पूर्ण केले. 23 चेंडूत 53 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. या दरम्यान या अनुभवी फलंदाजाने 230.43 च्या स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. तर आकाश दीप दोन धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे आरसीबीने 20 षटकांत 8 विकेट गमावून 196 धावा केल्या.
जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 21 धावा देत 5 बळी घेतले. आकाश मधवाल, श्रेयस गोपाल आणि जेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.