Live Cricket Score, MI vs RCB Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)शी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल.
हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये आरसीबीला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर गेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता.
या सामन्यात भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे. या दोन खेळाडूंनी राष्ट्रीय संघासाठी अनेक सामने फिरवले आहेत, पण आयपीएलमधील या दोन महान खेळाडूंमधील बॅट आणि बॉलचा थरार पाहण्यासारखा असेल. त्याचबरोबर कर्णधारपदाच्या बाबतीत सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या हार्दिक पांड्या आणि फाफ डुप्लेसिस यांचीही खडतर कसोटी लागणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं लागला आहे. ( Mumbai Indians won the toss and elected to field ) कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत फॅफ डुप्लेसिसचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
🔥 WE ARE BOWLING FIRST!
.
.
.
.
.
🪙
👍#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvRCB— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
दरम्यान, यंदाच्या मोसमात मुंबई आणि बंगळुरूची स्थिती जवळपास सारखीच आहे. मुंबई पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या आतापर्यंत एकूण 32 सामने झाले आहेत. यामध्ये मुबंईने 18 सामन्यात तर आरसीबीने 14 सामन्यात विजय मिळवला आहे.