Live Cricket Score, MI vs RCB Indian Premier League 2024 : आज IPL 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीची संधी दिली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईविरुद्ध 20 षटकांत आठ गडी गमावून 196 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे आणि मुंबई समोर विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
बेंगळुरूकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.. तर रजत पाटीदारने अर्धशतक झळकावले. या सामन्यात विराट कोहलीला केवळ तीन धावा करता आल्या. 14 धावांवर बुमराहने त्याला आपला शिकार बनवले. या वेगवान गोलंदाजाने कोहलीला आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाद केले. विल जॅकच्या रूपाने मुंबई संघाला दुसरी विकेट मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात जॅकला केवळ आठ धावा करता आल्या. त्याला 23 धावांवर आकाश मधवालने बाद केले.
यानंतर फाफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची मोठी भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने मोडली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या पाटीदारला त्याने यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले. रजत पाटीदारने 26 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याने 192.30 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि चार षटकार मारले. यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलची विकेट पडली जो शून्यावर बाद झाला. या सर्व मोसमात त्याची बॅट प्रभावी ठरली नाही.
Innings Break!
Fifties from Faf du Plessis (61), Rajat Patidar (50) & Dinesh Karthik(53*) guide #RCB to a total of 196/8.
Scorecard ▶️ https://t.co/Xzvt86cbvi#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/wcFqYPK8Kx
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
आरसीबीविरूध्द बुमराह सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार फाफ डुप्लेसिसला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने महिपाल लोमराला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर या वेगवान गोलंदाजाने 19व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. त्याने सौरव चौहान आणि विजयकुमार विशाक यांना बाद केले. यासह त्याने पाच विकेट्स मिळवण्याची कामगिरी केली.
IPL 2024 : …तर ‘यशस्वी जैस्वाल’साठी T20 World Cup 2024 चा मार्ग होणार खडतर
त्याचवेळी या सामन्यात दिनेश कार्तिकने दमदार कामगिरी केली. त्याने 22 चेंडूत 21 वे अर्धशतक पूर्ण केले. 23 चेंडूत 53 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. या दरम्यान या अनुभवी फलंदाजाने 230.43 च्या स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. तर आकाश दीप दोन धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे आरसीबीने 20 षटकांत 8 विकेट गमावून 196 धावा केल्या.
जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 21 धावा देत 5 बळी घेतले. आकाश मधवाल, श्रेयस गोपाल आणि जेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.