संगमनेर -सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन 2020-2021 या गळीत हंगामातील मशिनरी ओव्हर हॉलिंगचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्यातील मिल हाऊसमधील रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक गणपतराव सांगळे, दादासाहेब कुटे, भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, डॉ. तुषार दिघे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होता.
यावेळी ओहोळ म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी प्रतिकूल परिस्थितीत तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा पाया घातला. ही समृद्ध वाटचाल जपताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कायम शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, कामगारांचे हित जपले आहे. तसेच कारखान्याची सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम जपली आहे.
काळानुसार वाटचाल करताना नवीन कारखाना उभारणीचा धाडसी निर्णय घेतला असून, तो यशस्वी ही झाला आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढविले पाहिजे, असे ही ते म्हणाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, कारखान्याचे सर्व ओव्हर हॉलिंगचे कामे पूर्ण होत आले असून, सन 2020-2021 मध्ये येणाऱ्या उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप करण्यात येणार आहे.