World Cup 2023 IND vs ENG Match Update : यंदाच्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक गमावली आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. या सामन्यात रोहित शर्मा काहीशा सावधगिरीने खेळताना दिसला. सुरुवातीला तो खूप संथ होता आणि नंतर त्याने खेळ बदलून आपला वेग वाढवला. परंतु दुसऱ्या बाजूने पडणाऱ्या विकेट्स लक्षात घेऊन रोहितने संयमी खेळी केली. (IND vs ENG)
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने तीन षटकार ठोकल्याने तो या विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आला आहे. आता या विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर एकूण 20 षटकार लागले आहेत. त्याने डेव्हिड वॉर्नरला (Devid Warner) मागे टाकले ज्याने आतापर्यंत 19 षटकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नरने आत्तापर्यंत 6 सामन्यात 19 षटकार ठोकले आहेत तर रोहित शर्मानेही 20 षटकार मारले आहेत.
हे आहेत विश्वचषकातील टॉप 5 षटकार ठोकणारे खेळाडू
रोहित शर्मा – 20 षटकार
डेव्हिड वॉर्नर – 19 षटकार
हेनरिक क्लासेन – 17 षटकार
क्विंटन डी कॉक – 15 षटकार
कुशल मेंडिस – 14 षटकार
रोहित शर्माने 66 चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 54 वे अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील हा त्याचा तिसरा 50+ स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध 86, अफगाणिस्तानविरुद्ध 131, बांगलादेशविरुद्ध 48 आणि न्यूझीलंडविरुद्ध 46 धावा केल्या.विश्वचषकात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त डाव खेळणारा फलंदाज सचिन तेंडुलकर होता. रोहितचे हे वनडेतील ५४ वे अर्धशतक होते.