Rohit Sharma Love Story : रोहित शर्माची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. युवराज सिंगच्या बहिणीवर हिटमॅनचे मन हरपले होते. याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया….
रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणून खेळत आहे. या मोसमात तो संघाचा कर्णधार नाही. आज हंगामातील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार असून या सामन्याद्वारे रोहित शर्मा आयपीएलमधील आपल्या 250व्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.
या खास प्रसंगी, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या बहिणीच्या प्रेमात कसा पडला. रोहित शर्माच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह ( Ritika Sajdeh ) आहे आणि तुम्ही तिला अनेकदा स्टँडवरून रोहित शर्मासाठी चिअर करताना पाहिले असेल.
भारतीय संघाची क्रिकेटची महत्वाची स्पर्धा असो किंवा आयपीएल सामने असो रितिका नेहमीच रोहितच्या मागे खंबीरपणाने त्याला साथ देत उभी राहिली आहे. चला तर मग जाणून घेऊया, रोहित शर्मा आणि युवराज सिंगची बहीण रितिका यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली.
रितिकाने आपल्या करिअरची सुरुवात स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून केली होती. यावेळी रोहित शर्मा आणि युवराज सिंग हे तिचे क्लायंट होते. दरम्यान, युवराज सिंह रितिकाला बहीण म्हणत असे आणि ती युवीला राखी बांधत ( Yuvraj Singh’s sister Ritika Sajdeh ) असे.
रोहितची रितिकाशी पहिली भेट झाली ( Ritika Sajdeh-Rohit Sharma Love Story ) ती एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान. तेव्हा रोहित संघातील वरिष्ठ खेळाडू असलेल्या युवराजसिंगला भेटण्यासाठी तिथं पोहोचला. त्यावेळी रितिकाही तिथं होती. रोहितचं तिच्याकडं लक्ष गेलं आणि वारंवार त्याची नजर तिच्याकडे वळू लागली. रोहित रितिकाकडं पाहात असल्याचं लक्षात येताच युवराज त्याला म्हणाला, ‘तिच्याकडे बघूदेखील नकोस, ती माझी बहीण आहे.’
यावर रोहितनं, ‘काय भाई, मी तुम्हाला भेटायला आलो आहे.’ असं सांगत सारवासारव केली. तरीही नंतर रोहित रितिकाकडंच पहात राहिला; पण ती खूपच शिष्ट आहे, असं त्याला वाटलं. शूटिंगनंतर रितिका रोहितकडं गेली आणि काही अडचण असेल तर मला सांग, असं तिनं त्याला सांगितलं. यानंतर मात्र दोघांची चांगली मैत्री झाली.
रितिका रोहित शर्मासोबत मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांची मैत्री ( Rohit Sharma-Ritika Sajdeh Love Story )झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रोहित शर्मा आणि रितिका यांनी लग्नापूर्वी जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रोहितने कोणत्याही रेस्टॉरंट अथवा डिनर डेटला रितिकाला लग्नाची मागणी नाही घातली. तर वयाच्या 11 व्या वर्षी ज्या क्लबमध्ये त्याने आपल्या क्रिकेट करिअरला सुरूवात केली त्या बोरिवलीच्या ग्राऊंडवर त्याने गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले होते.
तिच्यासाठी मात्र हे सरप्राईज होते आणि तिने त्वरीत रोहितला लग्नाला होकार दिला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्यांचं लग्न झालं. 2018 मध्ये त्यांना एक मुलगीही झाली. तिचं नाव समायरा आहे.