Team India & Richard Kettleborough : भारतीय संघ आणि आयसीसीचे पॅनेल पंच रीचर्ड कॅटलबरो यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यातही याचीच प्रचीती आली.
आयसीसीच्या ज्या ज्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ उपांत्य किंवा अंतिम सामन्यात खेळला ते सर्व सामने गेल्या 12 वर्षांत भारतीय संघाने गमावले आहेत, विशेष म्हणजे या सर्व लढतींत मैदानावरील दोन पंचांपैकी एक पंच कॅटलबरोच होते.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2015 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्यानंतर 2016 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम लढतीत भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला.
अंपायर कॅटलबरो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी Unlucky…
2014 T20WC Final (Onfield Umpire)
2015 WC Semi Final (Onfield Umpire)
2016 T20WC Semi Final (Onfield Umpire)
2017 CT Final (Onfield Umpire)
2019 WC Semi Final (Onfield Umpire)
2021 WTC Final (TV Umpire)
2023 WTC Final (TV Umpire)
2019 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य लढतीतही भारतीय संघ पराभूत झाला. या सर्व पराभवांच्या लढतीत पंच कॅटेलबरोच मैदानावरील एक पंच होते. यंदाच्या 2023 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही हेच घडले.