ICC Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, भारताला मागे टाकत ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मात्र, वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. आयसीसी वनडे आणि टी-20 क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम आहे, पण कांगारूंनी टेस्ट फॉरमॅटमध्ये भारताला मोठा धक्का दिला आहे.
ICC कसोटी क्रमवारीत किती झाला आहे बदल ?
आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने 124 रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ 120 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशाप्रकारे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 रेटिंग गुणांचा फरक आहे. तर इंग्लंड क्रिकेट संघ 105 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 103 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या टॉप-4 संघांव्यतिरिक्त, उर्वरित संघांचे रेटिंग गुण 100 पेक्षा कमी आहेत. वास्तविक, भारतीय संघाने 2020-21 कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता, परंतु आता ही कसोटी मालिका क्रमवारीतून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भारतीय संघाला भोगावे लागले.
Australia on 🔝
Reigning World Test Championship winners overtake India to claim the No.1 position on the ICC Men’s Test Team Rankings after the annual update.https://t.co/rl0Ju11fNu
— ICC (@ICC) May 3, 2024
वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं वर्चस्व कायम…
तथापि, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की टीम इंडिया आयसीसी वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम आहे.
अलीकडेच आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. मात्र असे असूनही टीम इंडिया वनडे फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे.