World Cup 2023 IND vs AUS Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया नाही तर पंचच (umpire) मोठा धोका ठरू शकतात, असे सोशल मीडियावरील चाहत्याच म्हणणं आहे. याबदलची आकडेवारी देखील समोर आली आहे.
Team India & Richard Kettleborough : विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. पण पंच रिचर्ड केटलबोरो (Richard Kettleborough) हे जेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियासाठी मोठी समस्या बनू शकतात. वास्तविक, या विश्वचषकात रिचर्ड केटलबोरोचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. याशिवाय, भारताच्या मोठ्या सामन्यांमध्ये रिचर्ड केटलबरो हे पंच म्हणून असणे अत्यंत अशुभ (Unlucky) ठरलं आहे.
आता सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम फेरीतील पंच रिचर्ड केटलबोरोपासून धोका आहे.
ICC doesn’t have any better umpire than Richard Kettleborough or what. This guy is always there in our heartbreaks. pic.twitter.com/o7DVdHLCei
— R A T N I S H (@LoyalSachinFan) November 17, 2023
रिचर्ड केटलबोरो हे पंच म्हणून असणे हे टीम इंडियासाठी अशुभ…
पंच म्हणून रिचर्ड केटलबोरो हे आयसीसीच्या शेवटच्या मोठ्या नॉकआऊट सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचे साक्षीदार आहेत. T20 विश्वचषक 2014 च्या फायनलमध्ये भारतीय संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला होता, त्या सामन्यात रिचर्ड केटलबोरो अंपायरच्या भूमिकेत होते.
Hey Bhagwan, why is this guy still here in India? He should have left with the English team by now, right? 😉#RichardKettleborough #INDvsAUS #WorldcupFinal #NarendraModiStadium pic.twitter.com/vMh9pYcmcg
— Sann (@san_x_m) November 17, 2023
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषक 2015 च्या उपांत्य फेरीत पराभूत झाला, ज्यामध्ये रिचर्ड केटलबोरो यांनी पंच म्हणून काम पाहिले होते.
यानंतर, T20 विश्वचषक 2016 च्या फायनलमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजकडून पराभूत झाला होता, तेव्हा देखील रिचर्ड केटलबोरो हे टीम इंडियाच्या त्या पराभवाचे साक्षीदार होते.
रिचर्ड केटलबोरो आणि टीम इंडियाचे नशीब…
भारतीय संघाचे वाईट नशीब आणि पंच रिचर्ड केटलबोरो हा क्रम (सिलसिला) इथेच थांबला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली, परंतु अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. त्या सामन्यात देखील पंच म्हणून रिचर्ड केटलबारो होते.
वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यावेळी सुध्दा रिचर्ड केटलबारो हे टीम इंडियाच्या पराभवाचे साक्षीदार होते, रिचर्ड केटलबारो त्या सामन्यात पंचाच्या भूमिकेत होते.
आता रिचर्ड केटलबारो हे रविवारी(19 नोव्हेंबर) होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पंच म्हणून काम पाहतील, हे भारतासाठी चांगले लक्षण (Unlucky) आहे की नाही ते आता रविवारीच कळेल.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून विजय मिळवला. अशा परिस्थितीत चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. स्पर्धेत आतार्यंत सलग 10 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाची नजर आता विश्वचषकावर आहे.