घोरपडवाडीत 500 महिलांची आरोग्य तपासणी
भवानीनगर – महिलांनी कुटुंब सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे मत ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून व ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदा महिला संघ यशवंतराव चव्हाण सेंटर, शिवनंदन हॉस्पिटल बारामती, देसाई हॉस्पिटल लासुर्णे, ग्रामपंचायत घोरपडवाडी, जतन फाउंडेशन, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने घोरपडवाडी येथे महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिर पार पडले या शिबिरामध्ये 500 पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.
अनेक महिलांच्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. देसाई हॉस्पिटल माध्यमातून 200 पेक्षा जास्त डोळे तपासणी करून त्यांना सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मोफत चष्मे व औषधे देण्यात आली व 45 महिलांना डोळ्यांच्याची ऑपरेशनचा सल्ला दिला आहे. याप्रसंगी आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन घोरपडवाडी गावचे सरपंच राजेंद्र चांगन, महिला संघाचे विभाग प्रमुख श्री बाळासाहेब नगरे, प्रकाश साळुंखे, गजानन मोकाशी, तात्या शेलार, निकिता महामुनी, मंदाकिनी घोडके, सीमा पानसरे, घोरपडवाडीचे सरपंच राजेंद्र चांगण, उपसरपंच शोभा धालपे आदी उपस्थित होते.
+++++++++++