नगर -मयत वडिलांचे शेतामध्ये कबर बांधण्याकरता गेलेल्या मुलीला दहा जणांनी लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे घडली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजाता दिलीप पाटोळे (वय- 45 रा. मंगलगेट, नगर) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे आनंद शिवाजी जाधव, अर्चना आनंद जाधव, पप्पु काळपुंड, चैताली काळपुंड, भावड्या शिंदे (सर्व रा. निंबळक ता. नगर), महेश शिंदे, अलका शिंदे, मंदाबाई शिंदे (तिघे रा. पिंप्री घुमट ता. नगर), रणसिंग ऊर्फ पठ्ठ्या (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर), कांता बळीत (रा. विळद ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी फिर्यादी त्यांच्या पिंपळगाव माळवी येथील शेतामध्ये त्यांच्या मयत वडिलांचे कबर बांधकाम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तेथे सर्व आरोपी आले. तेव्हा आरोपी फिर्यादीस म्हणाले, या शेतामध्ये कबर बांधायची नाही, येथे पाय ठेवायचा नाही. असे म्हणत शिवीगाळ करुण मारहाण केली.