अररिया – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक चाहता आहे. दिनेश शर्मा हे त्याचे नाव असून राहुल यांची जेथे जेथे सभा असते तेथे दिनेश शर्मा पोहोचतात. शर्मा यांचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून ते अनवाणी राहत असून भारत भ्रमण करत आहेत. आताही ते अररिया येथे तसेच पोहोचले होते.
जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत आपण असेच राहणार असल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. ते मणिपूर येथून राहुल यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले असून तेंव्हापासून पायी चालत आहेत. मुंबई पर्यंत जाण्याची त्यांची तयारी आहे. आजही अररिया येथे राहुल यांच्या समर्थनार्थ हातात झेंडा घेत त्यांनी जोरदार घोषणाही दिल्या.
३० वर्षीय दिनेश मुळचे हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब कॉंग्रेसचा विचार मानणारे आहे. लहानपणापासूनच आपण कॉंग्रेस बाबत ऐकत आलो असल्याचे ते सांगतात आणि जेंव्हा मतदानाचा हक्क प्राप्त झाला तेव्हापासून ते राहुल यांचे चाहते झाले. त्यांचे राहुल यांच्या प्रति असलेले प्रेम यावरूनच समजू शकते की जेंव्हा आणि जेथे राहुल यांची सभा असते तेथे ते दाखल होत असतात. आपण राहुल यांच्यासमवेत संपूर्ण भारत फिरलो असल्याचे ते अभिमानाने सांगतात.