मुंबई – आमचे असंख्य मुस्लीम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा का? असा सवाल मनसे कडून उपस्थित करण्यात आला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 22, 2020
रायगड किल्ल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे.
पहा @nawabmalikncp घोषणा देत आहे का ? आणि देत नाहीत तर का ? याचे उत्तर महाराष्ट्राला @MumbaiNCP राष्ट्रवादी पक्षाने का देऊ नये ? pic.twitter.com/GD66P8sRMo
— Ram Kadam (@ramkadam) February 22, 2020
दरम्यान, नवाब मलिक यांचं गप्प बसल्याचं पाहून अनेकांनी त्यांचा निषेध नोंदविला आहे. तसेच, भाजप नेते राम कदम यांनी देखील नवाब मलिक आणि राष्ट्रवादी पक्षावर शाब्दिक निशाणा साधला आहे. राम कदम यांनी ससोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.