नबी दिल्ली : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कुत्र्यांना एक विचित्र सवय असते आणि ती म्हणजे वाहनांच्या मागे धावण्याची. धावत असतानाही कुत्रा इतका संतापतो की जणू तो संपूर्ण गाडी दातांनी पकडून उलटून ड्रायव्हरला ओरबाडून टाकेल. मात्र हे कुत्रे वाहनांच्या मागे का धावतात? कधी ते एकाच गाडीच्या मागे धावतात तर कधी रस्त्यात आलेली नवीन गाडी पकडतात आणि जीव खाऊन त्याच्यामागे धावत सुटतात. कुत्रे अशारितीने गाडीचा पाठलाग का करतात, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. चला तर, आज यामागील रोचक तथ्य जाणून घेऊया.
कुत्रे वाहनांच्या मागे पळण्यामागे चार प्रमुख कारणे आहेत.
* पहिले कारण – तुम्ही अनेकदा पाहिले असेल की कुत्रे कोणत्याही वाहनाच्या टायरवर लघवी करतात, ते असे करतात कारण ते जिथे जातात तिथे त्यांची जागा निश्चित करतात. जेणेकरून त्यांना कळेल की हा त्यांचा परिसर आहे आणि तुम्ही ती गाडी घेऊन दुसऱ्या भागात गेलात, तेव्हा तेथील कुत्रे तुमच्या भागातील कुत्र्याची लघवी ओळखतात आणि ते भुंकायला लागतात आणि तुमच्या गाडीचा पाठलाग करतात. यावरून असा अंदाज लावला जातो की कुत्रे नवीन वर्चस्व सहन करू शकत नाही आणि त्यामुळेच ते त्या टायरच्या मागे भुंकत पाठलाग सुरू करतात.
* दुसरे कारण – कुत्रे केवळ कारच्याच नव्हे तर दुचाकी आणि अगदी इतर प्राणी आणि लहान मुलांच्या मागे धावू लागतात. कारण ते खरे तर शिकारी प्राणी आहेत, त्यामुळे शिकारी खेळ खेळणे त्यांच्यासाठी मजेदार असते. कारण भटके कुत्रे निरुपयोगी आणि निरुद्योगी असतात. त्यामुळे ते वाहन आणि इतर लहान प्राणी व पक्ष्याच्या मागे धावतात कारण त्यांना त्यांचा पाठलाग करायला आवडते.
* तिसरे कारण – तुम्ही पाहिले असेल की कुत्रे वाहनांच्या खाली झोपत असतात, त्यावेळी त्यांना वाटते की ही जागा त्यांची आहे आणि हे त्यांचे घर आहे, परंतु जेव्हा वाहन सुरू होते तेव्हा त्यांना राग येतो कारण ते घर त्यांना सोडून जात आहे, असा त्यांचा समज होतो. चालत्या वाहनाने त्याचे घर दूर जात आहे, असे वाटून ते त्यांचा पाठलाग करतात.
* चौथे कारण – रस्त्यावरून जाणाऱ्या सुसाट वाहनांमुळे अनेक वेळा कुत्रे वाहनाखाली चिरडले जातात. हुशार कुत्रे सुटतात पण लहान पिल्ले यातून सुटू शकत नाहीत. अशा स्थितीत खुनी वाहनाचे चित्र मरण पावलेल्या कुत्र्यांच्या इतर वाचलेल्या कुत्र्यांच्या डोळ्यासमोर स्थिरावते. त्यामुळे जेव्हा जेव्हा कुत्र्यांना त्याच आकाराची आणि रंगाची गाडी दिसते तेव्हा समोर लहान पिल्लांच्या हत्येचे दृश्य येऊ लागते. त्यामुळे त्या गाडीचा बदला घेण्यासाठी वाहनांवर हल्ला करतात, असे म्हटले जाते. अर्थात हे सर्व अंदाज आहेत.