MNS Chief Raj Thackeray – 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी गेल्याच पंधरवड्यात तशी आखणी करून कामही सुरू केले आहे.
अशात २०२४ मध्ये पंतप्रधान कोण होणार असा प्रश्न चर्चेत आलाआहे आहे. याबाबत नाशिकमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’२०१४ मध्ये मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन’. असं म्हणत राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान नाशिक येथे पत्रकार परिषदेत अनेक मुद्यावर भाष्य केले ते पुढे म्हणाले,’मागच्या काही महिन्यांपासून मनसेचे पदाधिकारी अनेक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवावी आणि कुठे लढवू नये, याचा आढावा घेतला जात आहे. ज्यांच्या हातात केंद्र आणि राज्याची सत्ता आहे, तेही अशाप्रकारची चाचपणी करतात.’ असेही ते म्हणाले आहे.